शशी थरूर यांनी संसदेत काय केले पाहा…. नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shashi Tharoor chats with Supriya Sule as Farooq Abdullah gives a speech. Memes explode on Twitter

शशी थरूर यांनी संसदेत काय केले पाहा…. नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

मुंबई : काँग्रेस खासदार शशी थरूर पुन्हा एकदा नेटकऱ्यांसाठी चेष्टेचा विषय ठरले आहेत. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते फारूख अब्दुल्ला यांचे भाषण संसदेत सुरू असताना थरूर मात्र बाकावर हनुवटी टेकवून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी गप्पा मारण्यात दंग आहेत. या प्रसंगावरून समाजमाध्यमांवर अनेक मिम्स प्रसारित होत आहेत.

हेही वाचा: पालिकेच्या प्रभाग रचनेसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी

ट्विटरवरील ‘फारअगो अब्दुला’ या नावाच्या खात्यावरून एक दृकश्राव्य फीत प्रसारित करण्यात आली आहे. यात फारूख अब्दुल्ला भाषण करताना दिसत आहेत. त्यांच्या मागे सुप्रिया सुळे बसल्या असून शशी थरूर पुढे झुकून, हनुवटी बाकावर टेकवून सुळे यांच्याशी गप्पा मारण्यात दंग आहेत. या फितीमधील मूळ आवाज काढून त्याऐवजी ‘पुष्पा’ सिनेमातील ‘श्रीवल्ली’ हे गाणे लावण्यात आले आहे. तसेच इतरही काही मिम्स तयार करण्यात आले आहेत.

थरूर यांच्या मागे बसलेले खासदार हनुवटी हातात पकडून विचार करताना दिसत आहेत. त्यांच्याभोवती गोल करून ‘अच्छा बेटा विल सी यू आऊटसाइड’ असे वाक्य लिहिण्यात आली आहे. ‘ठिकाण कोणतेही असो, चर्चेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे’ असेही थट्टेने लिहिण्यात आले आहे.

Web Title: Sule As Farooq Abdullah Gives A Speech Memes Explode On

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..