
Women Empowerment
sakal
वाराणसीच्या सेवापुरी ब्लॉकमधील मडैया गावातील सुमन देवी, एक साधी महिला शेतकरी. कधीकाळी अडीच एकर शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर गुजराण करणाऱ्या सुमन देवी आज हजारो महिलांसाठी आत्मनिर्भरतेचा आदर्श बनल्या आहेत. आज त्या संपूर्ण वाराणसी जिल्ह्यात ‘कृषी सखी’ म्हणून ओळखल्या जातात. शेती आणि पशुपालन यांचा मिलाफ साधत, त्यांनी केवळ आपल्या कुटुंबालाच आर्थिक स्थैर्य दिले नाही, तर हजारो महिलांना उद्योजकतेचा मार्ग दाखवला.