महापुरुषही आधी देश फिरले; राहुल गांधींच्या 'भारत जोडो'चं BJPच्या दिग्गज नेत्यांकडून कौतुक

Sumitra Mahajan and Rahul Gandhi
Sumitra Mahajan and Rahul Gandhi

नवी दिल्ली - सध्या देशभरात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरून राजकारण तापलेलं आहे. त्यातच काँग्रेससाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचं कौतुक केलं आहे. शिवाय राहुल गांधी यांना थेट महापुरुषांच्या पंक्तीत नेवून बसवलं.

Sumitra Mahajan and Rahul Gandhi
1857 चा उठाव हातात कमळ घेऊनच झाला; G-20 लोगो वादावर राजनाथ सिंह यांचं अजब विधान

येत्या 20 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरमध्ये दाखल होत आहे, अशा परिस्थितीत माजी लोकसभा अध्यक्षांचे वक्तव्य आता चर्चेत आले आहे.

सुमित्रा महाजन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये आनंदाची लहर आली आहे. सुमित्रा महाजन म्हणालया की, राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण भारत समजून घेतील. आपण लोकशाहीत आहोत आणि लोकशाहीत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. विरोधी पक्षही मजबूत असला पाहिजे, जो संपूर्ण भारताला डोळ्यासमोर ठेवून बोलला पाहिजे. आम्ही जेव्हा विरोधात होतो, तेव्हा अटलजी, अडवाणी देशासाठी बोलत होते. त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव होती, असंही महाजन यांनी म्हटलं.

महाजन पुढं म्हणाल्या की, मी जेव्हा प्रवचन करायचे तेव्हा महापुरुषांचे उदाहरण देत होते. जेवढ्या महापुरुषांनी देशासाठी काम केलं, ते आधी देश फिरले. त्यानंतर कामाला सुरुवात केली. राहुल गांधींची देश फिरायची इच्छा झाली, ही खूप चांगली गोष्ट आहे, असंही महाजन यांनी म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com