esakal | पाक महिला पत्रकारासोबत थरूर होते तीन रात्री एकत्र?
sakal

बोलून बातमी शोधा

पाक महिला पत्रकारासोबत थरूर होते तीन रात्री एकत्र?

शशी थरूर आणि पाकिस्तानी पत्रकार मेहर तर्रारसोबत दुबईत तीन रात्री एकत्र घालवल्याचं सुनंदा यांचं म्हणणं होतं, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी कोर्टात दिली आहे. त्यामुळे शशी थरूर यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

पाक महिला पत्रकारासोबत थरूर होते तीन रात्री एकत्र?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप न सुटलेले कोडे आहे. पण, त्या काळात सुनंदा या मानसिक तणावाखाली होत्या. पती शशी थरूर आणि पाकिस्तानी पत्रकार मेहर तर्रार यांच्या कथित संबंधांवरून त्या अस्वस्थ होत्या.

थरूर आणि मेहर यांनी दुबईत तीन रात्री एकत्र घालवल्याचं सुनंदा यांचं म्हणणं होतं, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी कोर्टात दिली आहे. त्यामुळे शशी थरूर यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मोबाईलमध्ये रोमँटिक चॅटिंग
पत्रकार नलिनी सिंह यांच्याशी सुनंदा यांची चांगली मैत्री होती. त्यांनी नलिनी यांच्यासोबत खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणात नलिनी सिंह यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. काल दिल्लीतील कोर्टात झालेल्या सुनावणीत सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी नलिनी यांचा जबाब वाचला. त्यात म्हटले आहे की, मी सुनंदाला तीन-चार वर्षांपासून ओळखत होते. त्यामुळे त्या माझ्याशी अनेक खासगी गोष्टी शेअर करत होत्या. त्यांनी थरूर आणि मेहर यांच्या अफेर संदर्भातही माझ्याशी चर्चा केली होती. थरूर आणि मेहर यांनी दुबईत तीन रात्री एकत्र घालवल्याचं सुनंदा यांनी मला सांगितलं होतं. थरूर यांच्या मोबाईलमध्ये मेहरसोबतचे रोमँटिक चॅटिंग होते, असे सुनंदा यांनी नलिनी यांना सांगितले होते. त्यात मेहरसोबत लग्न करण्याविषयी चर्चाही होती. त्यासाठी सुनंदा यांना घटस्फोट देण्याविषयीही चर्चा होती.

मेहर तर्रार हेच कारण?
सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्ली पोलिसांनी थरूर यांच्या घरातील नोकरांचे जबाब नोंदवले आहेत. त्यानुसार सुनंदा आणि थरूर यांच्यात सातत्याने वाद व्हायचे. पाकिस्तानी पत्रकार मेहर तर्रार या वादाचे कारण असायच्या. दुबईत दोघांमध्ये मोठा वाद झाल्याची माहितीही यातून समोर आली आहे. पहाटे चार वाजेपर्यंत हा वाद सुरू होता. या पार्श्वभूमीवर थरूर यांच्या विरोधात सुनंदा यांच्या हत्येचा खटला चालवायला हवा, असे दिल्ली पोलिसांनी कोर्टात म्हटले आहे. जर, कोर्टाने आदेश दिला तर थरूर यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.

‘माझी आई स्ट्राँग होती’
दिल्ली पोलिसांनी याप्रकरणात सुनंदा यांचा मुलगा शिव मेनन यांचाही जबाब नोंदवला आहे. त्यात शिव याने म्हटले आहे की, माझी आई खूप स्ट्राँग होती. ती कधी आत्महत्या करू शकत नाही. सुनंदा यांच्या भावानेही पोलिसांना जबाब दिला असून, त्यात आपली बहीण तणावाखाली होती, असे म्हटले आहे.

loading image
go to top