
सुनीता आणि बुच विल्मोर यांचा ‘आयएसएस’वरील मुक्काम लांबल्याने त्यांनी ‘क्रू-९’ मोहिमेअंतर्गत वेगवेगळ्या कामांमध्ये भाग घेतल्याचे ‘नासा’ने सांगितले. यात अनेक वैज्ञानिक प्रयोग आणि आणि दुरुस्ती देखभाल उपक्रम आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांत महत्त्वाची भूमिका बजावली.
सुनीता विल्यम्स आणि सहकाऱ्यासाठी अवकाश स्थानक हे काही काळासाठी घरच झाले होते. या काळात विल्यम्स यांनी दोन ‘स्पेसवॉक’ केले. त्यातील एक विल्मोर यांच्याबरोबर तर दुसरा निक हेग यांच्याबरोबर केला. ‘इंटिग्रेट्रेड ट्रस स्ट्रक्चर’ वरील रेडिओच्या तरंगलांबीचा अँटेना बाजूला करणे, विश्लेषणासाठी ‘आयएसएस’च्या स्थानकाच्या बाह्य पृष्ठभागावरील नमुने गोळा करणे, एक्स-रे टेलिस्कोपवरील प्रकाशाच्या फिल्टरच्या खराब झालेला भागांना झाकण्यासाठी पॅच बसविणे अशी अनेक कामे विल्यम्स यांनी केली.