आठ एप्रिलला पाहायला मिळणार सुपरमून!

आठ एप्रिलला पाहायला मिळणार सुपरमून!
Updated on

नवी दिल्ली : जगात सर्वत्र जरी सुपरमून (पिंक मून) पाहता येणार असला तरी दुर्दैवाने भारतातील लोकांना सुपरमूनची घटना पाहणे शक्य होणार नाहीये कारण भारतीय वेळेनुसार त्यावेळी सकाळी आठ वाजले असतील आणि सर्वत्र प्रकाश असल्यामुळे चंद्र पाहणे शक्य होणार नाही. तरी देशातील सुपरमून पाहण्याची इच्छा असलेले लोक हा कार्यक्रम थेट ऑनलाइन पाहू शकणार आहेत.

२०२० मधील पुढील सुपरमून ८ एप्रिलला सकाळी ०८:०५ वाजता भारतीय वेळेनुसार दिसणार आहे आणि हे पाहण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा एक विशेष अनुभव असेल कारण त्यादिवशी  वर्षाचा सर्वात तेजस्वी चंद्र पाहायला मिळणार असून सर्वात मोठी पौर्णिमा असणार आहे. एप्रिलमधील या पौर्णिमेला पारंपारिकपणे पिंक मून (गुलाबी चंद्र) म्हणून ओळखले जाते. आणि यावर्षी पौर्णिमा असण्याव्यतिरिक्त यावर्षीचा सुपर पिंक मून सुद्धा असणार आहे.

दुर्दैवाने भारतातील लोकांना हा कार्यक्रम पाहता येणार नाही कारण त्यावेळी सकाळी आठ वाजले असतील व प्रकाश जास्त असेल. तरी  देशातील सुपरमून पहाण्याची इच्छा असलेले लोक हा कार्यक्रम थेट ऑनलाइन पाहू शकणार आहेत.
जर तुम्हाला सुपरमून म्हणजे काय हे माहित नसेल तर या बद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे. 

सुपरमून म्हणजे काय?

एक सुपरमून कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. आपल्या ग्रहाच्या जवळ असल्यामुळे, चंद्र खूप मोठा आणि तेजस्वी दिसतो. या महिन्याचा सुपर पिंक मून आपल्या ग्रहापासून ३,५६,९०७ किलोमीटर इतक्या लांब असणार आहे पृथ्वी आणि चंद्र यांच्यात सरासरी अंतर साधारणपणे ३,८४,००० किलोमीटर इतके आहे.

पौर्णिमेचा चंद्र हा सुपरमूनसाठी आवश्यक नसतो, कारण चंद्र पृथ्वी भोवताली फिरत असतो. चंद्र पृथ्वीपासून लांब असतानासुद्धा आपल्याला पौर्णिमेचा चंद्र पाहता येतो. सीएनईटीच्या एका अहवालानुसार ८  एप्रिलचा सुपरमून हा वर्षाचा सर्वात मोठा आणि नेत्रदीपक सुपरमून असेल.

त्याला पिंक मून (गुलाबी चंद्र) का म्हणतात?

जेव्हा पौर्णिमेच्या नावांचा विचार केला जातो तेव्हा ही प्रक्रिया सहसा मूळ अमेरिकन प्रदेश आणि तेथील हंगामांवर अवलंबून असते. पिंक मून  नावाचा अर्थ असा नाही की या दिवशी चंद्राचा रंग गुलाबी दिसेल, तर हे नाव उत्तर अमेरिकेच्या पूर्वेस वसंत ऋतूमध्ये फुलणाऱ्या गुलाबी फुलावरून (फ्लोक्स सुबुलाटा) देण्यात आले आहे. 

२०२० चा शेवटचा सुपरमून कधी होता?

२०२०  चा शेवटचा सुपरमून हा ९  मार्च ते ११  मार्च दरम्यान दिसला होता. मार्चच्या सुपरमूनला सुपर वॉर्म मून असे नाव देण्यात आले होते. 

भारतातून कसा पाहता येईल सुपर पिंक मून :

सुपर पिंक मून भारतीय वेळेनुसार सकाळी ०८:०५  वाजता दिसणार असल्यामुळे, देशातील लोकांना तो प्रत्यक्ष पाहता येणार नसल्यामुळे हा सुपर पिंक मून ऑनलाईन पाहावा लागणार आहे. स्लोह (Slooh) हा सुपरमून इव्हेंट त्यांच्या युट्युब वाहिनीवर थेट प्रसारित करणार आहे.

या व्यतिरिक्त व्हर्च्युअल टेलीस्कोप(Virtual Telescope) हि वाहिनीसुद्धा सुपरमूनचा थेट प्रक्षेपण दाखवण्यासाठी ओळखली जाते. येत्या काही दिवसांत त्यांच्या युट्युबवाहिनीवर सुद्धा या सुपर पिंकमूनचे प्रक्षेपण केले जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com