पंतप्रधानांच्या निवासस्थानावर आपचा मोर्चा 

वृत्तसंस्था
रविवार, 17 जून 2018

नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेला आहे. आम आदमी पक्षाने आता नायब राज्यपालांऐवजी थेट पंतप्रधांना लक्ष्य केले आहे. थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानावर आपने मोर्चा काढला. मात्र पंतप्रधानांच्या निवासस्थानावर पोहचण्यापुर्वीच हो मोर्चा पोलिसांकडुन अडवण्यात आला. आज (रविवार) चार वाजता निघालेल्या या मोर्चात आपचे खासदार संजय सिंह, दिलीप पांडे आणि पक्षाचे इतर नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.​

नवी दिल्ली- नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेला आहे. आम आदमी पक्षाने आता नायब राज्यपालांऐवजी थेट पंतप्रधांना लक्ष्य केले आहे. थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानावर आपने मोर्चा काढला. मात्र पंतप्रधानांच्या निवासस्थानावर पोहचण्यापुर्वीच हो मोर्चा पोलिसांकडुन अडवण्यात आला. आज (रविवार) चार वाजता निघालेल्या या मोर्चात आपचे खासदार संजय सिंह, दिलीप पांडे आणि पक्षाचे इतर नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

आपने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केंद्र सरकारच्या विरोधात लढाईची घोषणा केली आहे. #अब_रण_होगा या हॅशटॅगखाली ट्विट केले आहे. यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिस बळाचा वापर केला जात असल्याचे आपने म्हटले आहे. 

या मोर्चाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही पाठिंबा दर्शवला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सिताराम येचुरीही या मोर्चात सहभागी झाले होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी साहेब हे आंदोलन थांबवा, लोकांनी निवडलेल्या सरकारला काम करु द्या. असे ट्विट केले. 

दरम्यान, आम आदमी पक्ष (आप) आणि नायब राज्यपाल यांच्यात सुरू झालेला वादाबाबत आज(रविवार) पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ आणि आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन हा वाद मिटविण्यासाठी आवाहन केले. त्यामुळे हा वाद मिटविण्यासाठी पंतप्रधान मोदी मध्यस्थी करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in Support Of Arvind Kejriwal Aap Protest March To prim ministers Residence delhi