
गुजरातच्या मुंद्रा बंदरात ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक केलेल्या एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज आज ( १३ मे )सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. तसेच सहा महिन्यांनंतर जामिनासाठी न्यायालयात जाण्याची परवानगी दिली. हे प्रकरण २१,००० कोटी रुपयांच्या ड्रग्ज तस्करीशी संबंधित आहे. या प्रकरणात, दिल्लीतील व्यावसायिक हरप्रीत तलवार सिंगला अटक करण्यात आली आहे, ज्याची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने आरोपी हरप्रीत सिंह तलवार उर्फ कबीर तलवार यास सहा महिन्यांनंतर जामिनासाठी न्यायालयात जाण्याची परवानगी दिली.