
नवी दिल्ली: बिहारमध्ये मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणी न्यायालयाने निवडणूक आयोगाची भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले की, आधार हा नागरिकत्वाचा निर्णायक पुरावा मानला जाऊ शकत नाही, त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे.