
नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाने एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघाताबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना म्हटले की, या घटनेला केवळ 'पायलटची चूक' म्हणणे दुर्दैवी आहे. न्यायालयाने या प्रकरणी स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्र सरकार, DGCA आणि एअरक्राफ्ट ऍक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो (AAIB) यांच्याकडून उत्तर मागितले आहे.
एअर इंडिया विमान अपघाताच्या प्रकरणात वैमानिकाने जाणून-बुजून इंधन पुरवठा बंद केला होता, अशा अहवालांवर न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी असे दावे अत्यंत गैरजबाबदार असल्याचे म्हटले.