esakal | राजकीय पक्षांना उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी करावी लागणार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Supreme court ask all political parties to upload criminal background of candidate.jpg

गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी का देण्यात आली याची कारणे व अशा व्यक्तींच्या गुन्ह्यांची माहिती पक्षाच्या संकेतस्थाळावर टाकण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांना दिले आहेत. 

राजकीय पक्षांना उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी करावी लागणार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांना आता चाप बसणार असून सर्वोच्च न्यायालयाने तसे आदेशच पक्षांना दिले आहेत. गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी का देण्यात आली याची कारणे व अशा व्यक्तींच्या गुन्ह्यांची माहिती पक्षाच्या संकेतस्थाळावर टाकण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांना दिले आहेत. 

'हे' ११ नगरसेवक करणार राष्ट्रवादीत घरवापसी; गणेश नाईकांना मोठा धक्का..

गुन्हेगारी क्षेत्रातील अनेकांना राजकीय पक्षांमध्ये मोठमोठी पदे तसेच निवडणूकांमध्ये उमेदवारी देण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा व्यक्तींना उमेदवारी मिळू नये अशी मागणीही अनेकदा करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, आता या प्रकाराला चाप बसावा यासाठी सर्वोच्च न्यायालयानेच राजकीय पक्षांना फटकारले असून, कारणंही द्यायला सांगितली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यापूर्वी गुन्हा दाखल असलेल्या नेत्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवर आज (ता. १३) सुनावणी करण्यात आली. कोणत्याही पक्षाकडून एखाद्या व्यक्तीला उमेदवारी देताना त्यामागची कारणे, महत्त्वाची माहिती आणि त्याच्यावरील गुन्ह्यांसंदर्भातील माहिती पक्षाच्या संकेतस्थळावर जाहीर करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांना दिले आहेत. त्यामुळे आता तुम्ही निवडून दिलेल्या नगरसेवक, आमदार, खासदार यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तुम्हाला लवकरच संकेतस्थळावर कळेल.