esakal | 'हे' ११ नगरसेवक करणार राष्ट्रवादीत घरवापसी; गणेश नाईकांना मोठा धक्का..
sakal

बोलून बातमी शोधा

'हे' ११ नगरसेवक करणार राष्ट्रवादीत घरवापसी; गणेश नाईकांना मोठा धक्का..

'हे' ११ नगरसेवक करणार राष्ट्रवादीत घरवापसी; गणेश नाईकांना मोठा धक्का..

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी मुंबई - भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. स्वतः अजित पवार यांनी नवी मुंबई महानगर पालिका पुन्हा महाविकास आघाडीकडे आणण्याच्या विडा उचलला आहे. याच प्राश्वभूमीवर आता मोठ्या राजकीय घडामोडींचा वेग आल्याचं पाहायला मिळतंय. गणेश नाईक यांच्यासोबत भाजपात गेलेले ११ नगरसेवक भाजपाला राम राम ठोकून पुन्हा आपल्या मूळ पक्षात म्हणजेच राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. 

भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसलीय. दरम्यान, ११ नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत किंवा महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये गेलेत तर भाजपाला आणि गणेश नाईकांना हा मोठा धक्का मानला जातोय. गणेश नाईक भाजपात जाताना पन्नासपेक्षा जास्त नगरसेवक ते भाजपात घेऊन गेले होते. यामुळे राष्ट्रवादीचा बाल्लेकिल्ला फुटून भाजपकडे गेलेला आपण पाहिलं. दरम्यान महाराष्ट्रात राजकीय समीकरण बदललं. राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. अशात बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे काही नगरसेवक धास्तावलेले पाहायला मिळतायत. 

मोठी बातमी कांदाभजी चाहत्यांसाठी खुशखबर; सुटलाय पुन्हा घमघमाट

नवी मुंबईतील कोपरखैरणे आणि घणसोली भागात माथाडीवर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील मोठा मतदार आहे. अशात त्यांची काही मतं ही शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाताना पाहायला मिळतात. अशात तिथले नगरसेवक राष्ट्रवादीकडे पुन्हा येण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. 

याचसोबत तुर्भे आणि नेरूळमधील काही भागात मुस्लिम वोट्सर्स जास्त आहेत. अशात त्यांचं मतदान हे भाजपाला जाणार नाही अशी शक्यता आहे. त्यामुळे तिथले नगरसेवक देखील राष्ट्रवादीत येण्याची चिन्ह आहेत. अशातच तुर्भ्यातील सुरेश कुलकर्णी, ज्यांना गणेश नाईकांच्या जवळचं देखील मानलं जात होतं, हे आपल्यासोबत ४ नगरसेवकांना घेऊन शिवसेनेत दाखल होणार अशी शक्यता आहे. त्यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतलीये. अशातच आज भाजपच्या ६ नगरसेवकांनी मंत्रालयात जाऊन राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. 

मोठी बातमी सिडको मेगा गृहप्रकल्पातील थकबाकीदारांना मोठा दिलासा

एकूणच ११ नगरसेवक येत्या काळात गणेश नाईक आणि भाजपाची साथ सोडून पुन्हा राष्ट्रवादी जाताना पाहायला मिळणार असं राजकीय विश्लेषक म्हणतायत. तसं झालं तर भाजपाला येत्या महानगरपालिका निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो.  

6 bjp corporators met ajit pawar eleven bhp corporators might rejoin NCP