Lakhimpur Case - शेकडो शेतकरी होते, मग फक्त २३ साक्षीदार कसे? सुप्रीम कोर्टाचा योगी सरकारला सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेकडो शेतकरी असताना फक्त २३ साक्षीदार कसे? सुप्रीम कोर्टाचा सवाल

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे.

शेकडो शेतकरी असताना फक्त २३ साक्षीदार कसे? सुप्रीम कोर्टाचा सवाल

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे. घटनास्थळी शेकडो शेतकरी होते तरी तुम्हाला फक्त २३ साक्षीदारच कसे मिळाले असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला. उत्तर प्रदेश सरकारला घटनेतील साक्षीदारांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. लखीमपूर प्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशीच्या याचिकेवार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पुढची सुनावणी ८ नोव्हेंबरला होणार आहे.

हिंसाचार प्रकरणी तपासाबाबत अहवाल देण्यास सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारने सांगितले. तसंच पत्रकार रमण कश्यप आणि श्याम सुंदर यांच्या हत्येबाबतही अहवाल द्या असे आदेश न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत. संबंधित घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत त्याचा फॉरेन्सिक लॅब रिपोर्ट सादर करा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

टॅग्स :Lakhimpur