Drugs Case : आर्यन खान ते समीर वानखेडे व्हाया नवाब मलिक; आतापर्यंत काय घडलं?

Drugs Case : आर्यन खान ते समीर वानखेडे व्हाया नवाब मलिक; आतापर्यंत काय घडलं?

राज्यात सध्या एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून खळबळजनक आरोप केले जात आहेत. समीर वानखेडे यांच्या ड्रग्ज विरोधातील कारवायांवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत अनेक आरोप मलिकांनी केले आहेत. यासंदर्भात काही कागदपत्रे आणि फोटोज मलिक यांनी शेअर केले आहेत. २ ऑक्टोबरला कार्डेलिया क्रूजवर झालेल्या कारवाईत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यानंतर आतापर्यंत त्याला जामीन मिळालेला नाही. त्याच्या जामीनावर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, कार्डेलिया ड्रग्ज केस आता समीर वानखेडे प्रकरणापर्यंत पोहोचलं आहे. आतापर्यंत मलिक यांनी वानखेडेंच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं होतं. त्यानंतर वानखेडे मुस्लिम असल्याचं आणि त्यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोपसुद्धा मलिक यांनी केला. याशिवाय एका अज्ञात एनसीबी अधिकाऱ्याने आपल्याला पत्र पाठवून त्यातही खळबळजनक अशी माहिती दिल्याचं सांगत नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

आतापर्यंत या प्रकरणात काय घडलं?

2 ऑक्टोबर - मुंबईत कार्डेलिया क्रूजवर रेव्ह पार्टीत एनसीबीने धाड टाकली. यामध्ये आर्यन खान, मुनमुन धमेचा, अरबाज खान मर्चंटसह आणखी सहा जणांना अटक करण्यात आली.

३ ऑक्टोबर- आर्यन खानला अटक करण्यात आल्याची माहिती एनसीबीने दिली. अंमली पदार्थ प्रकरणी त्याला अटक केली आणि त्यानंतर वैद्यकीय चाचणी करण्यात आली.

४ ऑक्टोबर - आर्यन खानच्या जामीन अर्जावर पहिल्यांदा सुनावणी झाली. एनसीबीने ११ ऑक्टोबरपर्यंत कस्टडीची मागणी केली. आर्यनने ड्रग्ज घेतले नसल्याचा आर्यनच्या वकिलांचा युक्तीवाद केला. मात्र, न्यायालयाने आर्यनला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कस्टडी सुनावली.

६ ऑक्टोबर - एकीकडे एनसीबीचा तपास सुरु असताना नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी मनिष भानुशाली आणि केपी गोसावी हे कारवाई वेळी कसे असा प्रश्न विचारला.

७ ऑक्टोबर - मुंबई न्यायालयाने आर्यन खानला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली.

८ ऑक्टोबर - आर्यन खानला ऑर्थर रोड तुरुंगात पाठवण्यात आले.

९ ऑक्टोबर - नवाब मलिक यांनी आणखी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात काही लोकांना एनसीबीने सोडल्याचा आरोप मलिक यांनी केला.

१० ऑक्टोबर - क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने शाहरुख खानच्या चालकाचा जबाब नोंदवला.

११ ऑक्टोबर - आर्यन खानच्या जामीनावर सुनावणी १३ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. तसंच एनसीबीला उत्तर देण्याचे आदेश दिले.

१२ ऑक्टोबर - नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर समीर वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला.

Drugs Case : आर्यन खान ते समीर वानखेडे व्हाया नवाब मलिक; आतापर्यंत काय घडलं?
समीर वानखेडेंच्या नियुक्तीत अमित शाह कनेक्शन? पत्रातून गंभीर आरोप

१४ ऑक्टोबर - न्यायालायने आर्यन खानच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला. त्यामुळे आर्यनला दिलासा मिळाला नाही. त्याच दिवशी दुसऱ्या बाजुला नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कार्यालयातले काही फोटो शेअर केले. जावयाच्या कार्यालयात टाकलेल्या धाडीवेळी एनसीबीला काहीच सापडले नव्हते असा दावा त्यांनी यावेळी केला. तर वानखेडे यांनी आपण समीर खानच्या जामीनाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत असल्याचं सांगितलं.

१६ ऑक्टोबर - नवाब मलिक यांनी फ्लेचर पटेल या साक्षीदारावर प्रश्न उपस्थित केला. एनसीबीच्या तीन कारवायांमध्ये एकच पंच कसा असा प्रश्न त्यांनी विचारला. फ्लेचर पटेलचे आणि समीर वानखेडे यांच्या कुटुंबाचे काय संबंध असं विचारत काही फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले.

२० ऑक्टोबर - न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने अर्ज फेटाळला.

२१ ऑक्टोबर - नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर खंडणीचे आरोप केले. समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांचे मालदीवला गेलेले फोटोज त्यांनी शेअर केले. बॉलिवूड सेलिब्रेटींसोबत तिथे कसे असा सवाल मलिक यांनी केला. यावर वानखेडे यांनी आपण कुटुंबासोबत गेलो होतो आणि यासाठी एनसीबीकडून परवानगीसुद्धा घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

२४ ऑक्टोबर - एनसीबीचा पंच असलेल्या प्रभाकर सलील यांनी समीर वानखेडे यांच्यावर धक्कादायक असे आरोप केले. आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटींची खंडणी समीर वानखेडे यांनी मागितल्याचा आरोप त्यांनी केला. वानखेडे यांनी हे आरोप फेटाळून लावले. तर एनसीबीने प्रभाकर सलील याच्या आरोपानंतर याप्रकरणी समीर वानखेडे यांची खात्याअंतर्गत चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं.

Drugs Case : आर्यन खान ते समीर वानखेडे व्हाया नवाब मलिक; आतापर्यंत काय घडलं?
"ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळू नये यासाठी वानखेडे काय करतात?"

२५ ऑक्टोबर - प्रभाकर सलील यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपाचे वादळ शमण्याआधीच नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा फोटो आणि वडिलांचे नाव दाऊद असल्याचा दावा करत आणखी एक आरोप केला. बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवली असल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलं. हे सर्व आरोपसुद्धा समीर वानखेडे यांनी फेटाळून लावले. तसंच आपण हिंदू असून आई मुस्लीम असल्याचं वानखेडेंनी स्पष्ट केलं.

२६ ऑक्टोबर - आज आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी आहे. दरम्यान, नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यासंदर्भात एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याने आपल्याला पत्र पाठवल्याचा दावा केला. हे पत्रसुद्धा नवाब मलिक यांनी शेअर केले. यात वानखेडे खोट्या केसेस दाखल करतात, जामीन मिळू नये यासाठी ड्रग्जचे प्रमाण वाढवून सांगतात यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com