esakal | चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर विचार करा; न्यायालयाचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

chidambaram

या आदेशात सुधारणा करावी, अशी विनंती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे केली. या विनंतीनंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी गुरुवारऐवजी मंगळवारीच (ता. 3) घेण्याचा निर्णय घेतला. 

चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर विचार करा; न्यायालयाचे आदेश

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर विचार करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज सत्र न्यायालयाला दिले.

या आदेशात सुधारणा करावी, अशी विनंती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे केली. या विनंतीनंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी गुरुवारऐवजी मंगळवारीच (ता. 3) घेण्याचा निर्णय घेतला. 

सकाळच्या सत्रातील सुनावणी दरम्यान चिदंबरम यांनी आपल्याला न्यायालयीन कोठडीअंतर्गत तिहार तुरुंगात पाठविले जाऊ नये, त्याऐवजी स्थानबद्ध करावे, अशी विनंती केली. त्यावर न्यायालयाने चिदंबरम यांच्या अंतरिम जामीन अर्जावर विचार करण्याचे आदेश सत्र न्यायालयाला दिले होते. मात्र, दुपारच्या सत्रात सॉलिसिटर जनरल मेहता यांनी आधीच्या आदेशाची अंमलबजावणी करताना न्यायक्षेत्राबाबत अडचणी निर्माण होतील, असे निदर्शनास आणून दिले. यानंतर, न्यायालयाने या प्रकरणी उद्याच सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले.

loading image
go to top