
नवी दिल्लीः बिहारमधील मतदार यादीतून ज्या ६५ लाख लोकांची नावे वगळण्यात आली आहेत, त्या नावांची यादी येत्या मंगळवारपर्यंत जारी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. संबंधित लोकांची जिल्हानिहाय यादी सार्वजनिक करतानाच कोणत्या कारणासाठी नाव हटवण्यात आले, त्याचे कारण देण्यासही न्या. सूर्यकांत आणि न्या. जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठाने सांगितले आहे. निधन, स्थलांतर तसेच दुहेरी नोंदणीकरण आदी कारणांमुळे ६५ लाख लोकांची नावे वगळण्यात आल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले होते.