

Supreme Court of India seeks the Central Government's response on possible legal restrictions and public awareness regarding marriages between close blood relatives
esakal
रक्ताच्या जवळच्या नात्यांमध्ये विवाह करण्याच्या प्रथेबाबत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. अशा विवाहांमुळे जन्माला येणाऱ्या मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या पार्श्वभूमीवर अशा विवाहांना प्रतिबंध घालण्यासाठी कायदा करता येईल का, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. त्याचबरोबर या विषयावर समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरजही न्यायालयाने अधोरेखित केली.