
नवी दिल्ली : ऑलिपिंक पदक विजेता कुस्तीगीर सुशीलकुमार याचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केला. सागर धनकड नावाच्या अन्य कुस्तीपटूच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सुशीलकुमारला काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन दिला होता. या आदेशाला सागरचे वडील अशोक धनकड यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायाधीश संजय करोल आणि न्यायाधीश प्रशांतकुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.