Supreme Court : भटक्या कुत्र्याने चावा घेतला तर त्याला खायला घालणारा जबाबदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stray dogs

Supreme Court : भटक्या कुत्र्याने चावा घेतला तर त्याला खायला घालणारा जबाबदार

नवी दिल्ली : जर भटक्या कुत्र्याने एखाद्या व्यक्तीला चावा घेतला तर रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालणाऱ्याला जबाबदार धरले जाईल असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय देताना पाळीव प्राण्यांचे हक्क आणि मानवाच्या सुरक्षेचा विचार करणे गरजेचे आहे असं स्पष्टीकरण कोर्टाने दिलं आहे.

भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावर तोडगा काढण्यासाठी न्यायालयाने भर दिला असून भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यास सदर रूग्णाच्या उपचाराचा खर्चही भटक्या कुत्र्यांना खायला देणाऱ्यांनी उचलावा असं न्यायालयाने पुढं म्हटलं आहे. केरळातून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान कोर्टाने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि जे. महेश्वरी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला असून सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती खन्ना यांनी आपण श्वानप्रेमी असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर जे लोकं भटक्या कुत्र्यांना खायला घालतात ते लोक अशा कुत्र्यांवर लक्ष ठेवू शकतात असंही न्यायमुर्तींनी सांगितलं.

हेही वाचा: परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या OBC विद्यार्थ्यांना धक्का; फ्री शीप योजना रद्द

भटक्या कुत्र्याने एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्यास त्या व्यक्तीच्या उपचाराची सर्व जबाबदारी त्याला खायला घालणाऱ्या व्यक्तीची असेल कारण कुत्र्याला खायला घालणाऱ्या व्यक्ती आणि हल्ला झालेल्या व्यक्तींमध्ये समतोल राखणे गरजेचे आहे असं मत न्यायमुर्ती खन्ना यांनी व्यक्त केलं आहे. तर भटक्या कुत्र्यांची समस्या आपण मान्य करायला पाहिजे असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं.

केरळ सरकारची बाजू मांडणारे अधिवक्ता व्ही. के. बिजू यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की, ऑगस्टमध्ये कुत्र्यांच्या हल्लामध्ये आठ लोकांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये शाळकरी मुले आणि महिलांचा सामावेश आहे. त्याचबरोबर वकिलाने केरळमधील एका 12 वर्षीय मुलीचा कुत्र्याने चावा घेतल्यामुळे झालेला मृत्यूचा संदर्भ दिला आहे.

Web Title: Supreme Court Canines Attack Liable Who Feed Stray Dogs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Supreme CourtDog