

Lawyer Praveen Singhal faces possible criminal contempt proceedings following his controversial remarks against Chief Justice of India Surya Kant inside the Supreme Court
esakal
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याशी न्यायालयातच गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या वकील प्रवीण सिंघल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सिंघल यांच्याविरोधात फौजदारी न्यायालयीन अवमानाची कारवाई सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांच्या आदेशावर आक्षेप घेत त्यांना पदावरील खुर्चीवर बसण्याची पात्रता नसल्याचे वक्तव्य वकिलाने केले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने संबंधित वकिलावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.