CJI Surya Kant Slams Allahabad High Court Over Sensitive Remark
esakal
देश
Supreme Court : ''महिलेच्या स्तनाला हात लावणे बलात्काराचा प्रयत्न नाही'' म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर संतापले CJI सूर्य कांत; कोर्टरुमध्ये नेमकं काय घडलं?
CJI Surya Kant Slams Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाने पीडिताच्या स्तनाला हात लावणे किंवा पायजाम्याचा नाडा सोडणे हा बलात्काराचा प्रयत्न समजला जात नाही, असं म्हटलं होतं. यावरून सरन्यायाधीशांनी संताप व्यक्त केला.
CJI Surya Kant: लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयांनी काळजीपूर्वक सुनावणी घ्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली जातील, असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने लैंगिक शोषण प्रकरणाच्या सुनावणीवेळी आश्चर्यकारक टिप्पणी केली होती. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
