

CJI Surya Kant
Esakal
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून दोन महत्त्वाची प्रकरणे काढून घेतली आहेत. या प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या प्रशासकीय आणि नियामक त्रुटींचा मुद्दा देशव्यापी पातळीवर उपस्थित करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयातील चार वरिष्ठ न्यायाधीशांनी या निर्णयाला पाठिंबा दिल्यानंतर सरन्यायाधीशांनी हा निर्णय घेतला. या घडामोडीमुळे संभाव्य धार्मिक वादही टळल्याचे वृत्त समोर आले आहे.