

CJI Suryakant
esakal
सुप्रीम कोर्टाने गुरुवारी एका ॲसिड हल्ला पीडित महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्याययंत्रणेवरील प्रचंड विलंबाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ही घटना २००९ सालची असून आतापर्यंत खटला पूर्णत्वास गेलेला नाही, यामुळे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, राष्ट्रीय राजधानी दिल्लीसारख्या ठिकाणी जर एवढ्या गंभीर प्रकरणाला न्याय मिळू शकत नाही, तर देशातील इतर भाग कसे हाताळतील? हा संपूर्ण न्यायव्यवस्थेसाठी अत्यंत लाजिरवाणा विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.