Supreme Court: विशेष तपास पथकाची ‘वनतारा’ला ‘क्लीन चिट’
Vantara: गुजरातमधील रिलायन्स फाउंडेशनच्या ‘वनतारा’ प्राणी संवर्धन केंद्राला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. विशेष तपास पथकाच्या अहवालानंतर केंद्राने नियमांचे पालन केले असल्याचे नमूद झाले.
नवी दिल्ली : गुजरातच्या जामनगरमधील वनतारा प्राणी संवर्धन व पुनर्वसन केंद्राच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याला क्लीन चिट दिली आहे, असे आज सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.