
नवी दिल्ली : दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन याला आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा देतानाच त्याच्या ‘ठग ऑफ लाइफ’ या चित्रपटाच्या कर्नाटकातील प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला. ‘‘काही स्वयंघोषित संघटना आणि समूहांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे,’’ असे निरीक्षण न्यायालयाने सुनावणीवेळी नोंदविले.