

CJI SuryaKant
esakal
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका महत्त्वाच्या निरीक्षणात स्पष्ट केले की, खुनी गुन्हेगार सुधारणा करू शकतो, परंतु सायबर गुन्हेगारांना मात्र जामिनावर सोडता कामा नये. सायबर फसवणुकीच्या एका प्रकरणातील आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचोली यांच्या खंडपीठाने हे मत नोंदवले. खंडपीठाने म्हटले की, “खुनीला सोडून त्याला सुधारण्याची शक्यता असू शकते, मात्र सायबर गुन्हेगारांना अजिबात सोडले जाऊ नये.”