दिल्लीत कोरोनाचा उद्रेक; व्हर्च्युअल सुनावणी घेण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय

दिल्लीत वाढतोय ओमिक्रॉनचा संसर्ग
Supreme Court of India
Supreme Court of IndiaTeam esakal

नवी दिल्ली : दिल्लीत सातत्यानं कोरोनाचे त्यात ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यासाठी प्रशासनानं अनेक निर्बंधही लागू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सुप्रीम कोर्टानंही कोर्टामध्ये (Supreme Court) गर्दी टाळण्यासाठी व्हर्च्युअल सुनावणी (Virtual hearings) घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून पुढील पंधरा दिवस अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरु राहणार आहे. यासंदर्भात कोर्टानं एक परिपत्रकही काढलं आहे. (Supreme Court decided to shift hearings on virtual mode from January 3 for two weeks)

परिपत्रकानुसार, सुप्रीम कोर्टाच्या सर्व बार सदस्यांना, आशिलांना सूचित करण्यात येतं की, ओमिक्रॉनबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, ७ ऑक्टोबर २०२१ रोजी काढलेल्या सुधारित स्टॅंडर्ड ऑपरेटिंग सिस्टिम (एसओपी) नुसार, सध्या प्रत्यक्ष कोर्टातील सुनावणी स्थगित करण्यात येत असून या सर्व सुनावणी आता पुढील दोन आठवडे केवळ व्हर्च्युअल पद्धतीनं घेण्यात येतील. सोमवार, ३ जानेवारी २०२२ पासून हा आदेश लागू होईल.

Supreme Court of India
...तर कार्यक्रमांचं निमंत्रण स्विकारणार नाही; अजित पवारांनी ठणकावलं!

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिल्लीकरांना कोविडच्या स्थितीची माहिती देताना सांगितलं की, सध्या शहरात ओमिक्रॉनचा संसर्ग वेगानं वाढत आहे. पण नागरिकांनी घाबरुन जाण्याचं कारण नाही. कारण बाधा झालेले रुग्ण सौम्य आणि लक्षणंविरहित आहेत. दिल्लीत सध्या ६३६० अॅक्टिव्ह रुग्ण असून दिवसभरात ३१०० नवे रुग्ण आढळले आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com