
Supreme Court acknowledges Aadhaar Card as the 12th valid document in Bihar’s SIR case, strengthening its legal acceptance.Court
Aadhaar Card as the 12th valid document in Bihar’s SIR case : बिहरामध्ये सुरू असलेल्या एसआरए सर्वेबाबत एक मोठी अपडेट आली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निकाल देताना बिहारमधील मतदारांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, निवडणूक अधिकाऱ्यांकडून आधार कार्डला आता बारावे कागदपत्र म्हणून मानलं जाईल.
तर बिहारमध्ये जे लाखो मतदार मतदार ओळखपत्र आणि आधार कार्डला मान्यतान नसल्या कारणाने, मतदार यादीत नाव जोडण्यासाठी आपली जुनी कागदपत्रं दाखवू शकत नव्हते, त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने फायदा होणार आहे.
याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला १२ वे कागदपत्र म्हणून आधार कार्ड स्वीकारण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यास सांगितले आहे. तर एसआयआरवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आधार कार्डला यादीत स्थान देता येईल. मात्र, ते नागरिकत्वाचा पुरावा म्हणून स्वीकारले जाणार नाही. आधार कार्डची सत्यता आणि वास्तविकता तपासण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना असेल.
एसआयआर अंतर्गत, निवडणूक आयोगाने बिहारमधील सर्व नागरिकांना त्यांचे नागरिकत्व प्रमाणपत्र दाखवण्याची मागणी केली होती. यासाठी निवडणूक आयोगाने ११ कागदपत्रांची यादी जारी केली होती ज्याद्वारे नागरिकत्व सिद्ध करता येते. पण आता सर्वोच्च न्यायालयाने १२ वे कागदपत्र म्हणून आधार कार्ड जोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे बिहारमधील लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.