Gyanvapi Mosque
Gyanvapi MosqueSakal

Gyanvapi Mosque: ASI सर्व्हेचा मार्ग मोकळा; स्थगितीला नकार देत सुप्रीम कोर्टानं दाखवला हिरवा कंदील

ज्ञानवापीच्या ASI सर्व्हेक्षणाला हायकोर्टानं नुकतीच परवानगी दिली होती.
Published on

Gyanvapi mosque ASI Survey : ज्ञानवापी मशीद परिसराच्या पुरातत्व सर्व्हेक्षण विभागामार्फत सर्व्हेक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. त्यामुळं या ठिकाणंच ASI सर्व्हेक्षण आता सुरुच राहणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. (Supreme Court declines to stay scientific survey by ASI of Gyanvapi mosque premises)

हा निर्णय देताना सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, ASIनं हे स्पष्ट केलं आहे की, संपूर्ण सर्व्हेक्षण हे कोणत्याही उत्खननाशिवाय आणि संरचनेला कोणतेही नुकसान न करता पूर्ण केले जाईल. त्यामुळं या सर्व्हेक्षणाला स्थगिती देण्यात येणार नाही.

Gyanvapi Mosque
Rahul Gandhi : राहुल गांधींची पुन्हा लोकसभेत होणार एन्ट्री; फक्त करावं लागेच एकच काम

दरम्यान, अलाहाबाद हायकोर्टात सलग दोन दिवस न्यायालयात युक्तिवाद झाला. त्यानंतर कोर्टानं दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर २७ जुलै रोजी निर्णय राखून ठेवला होता. त्यावर काल अलाहाबाद उच्च न्यायालयानं ज्ञानवापीच्या एएसआय सर्वेक्षणाविरोधात केलेली याचिका फेटाळत मस्जिदीच्या सर्व्हेला परवानगी दिली. हायकोर्टाच्या या निर्णयानंतर अंजुमन इंतेजामिया मसाजिदनं पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com