

Supreme Court
sakal
नवी दिल्ली : ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या सायबर गुन्ह्यांची प्रकरणे देशात वाढत असून, याविरोधात कठोर कारवाईची गरज सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिक ‘डिजिटल अरेस्ट’चे सर्वांत जास्त बळी ठरत असून, तीन हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेवर गुन्हेगारांनी डल्ला मारला असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.