Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने युट्यूबर रणवीर अलाहाबादियाची पासपोर्ट परत देण्याची याचिका फेटाळली आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबत दोन आठवड्यांत तपास पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
नवी दिल्ली : पासपोर्ट परत दिला जाण्याच्या विनंतीची युट्यूबर रणवीर अलाहाबादियाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. दरम्यान येत्या दोन आठवड्यांत तपास पूर्ण करण्याचे आश्वासन महाराष्ट्र सरकारकडून मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी देण्यात आले.