Supreme Court: फटाके फोडण्यावर सरसकट बंदी नाही; वेळेचे बंधन पाळणे आवश्‍यक असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट

Supreme Court, Diwali Crackers, Delhi Pollution — फटाक्यांवर सरसकट संपूर्ण बंदी घातली जाणार नाही, मात्र फटाके फोडण्यासाठी ठराविक वेळ आणि विशिष्ट प्रकारांबाबत नियम असतील, अशी टिपणी सर्वोच्च न्यायालयाने केली. बेरियम आणि फटाक्यांच्या आवाजाच्या डेसिबल मापनाबाबतही निर्देश देण्यात आले.
Supreme Court
Supreme Court

sakal

Updated on: 

नवी दिल्ली, : ‘‘फटाक्यांवर सरसकट संपूर्ण बंदी घातली जाणार नाही, मात्र त्याचवेळी चोवीस तास फटाके फोडण्याची मुभाही दिली जाणार नाही,’’ अशी टिपणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केली. ‘‘दिवाळीचा सण हा लोकांच्या भावनांशी जोडलेला आहे. त्यामुळे फटाक्यांवर सरसकट बंदी घातल्यास लोकांच्या भावना दुखावू शकतात. या मुद्द्यावर संतुलित मार्ग काढावा लागेल,’’ असे न्यायालयाकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com