आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Supreme Court on Election Process : निवडणूक प्रक्रियेत न्यायालये सहसा हस्तक्षेप करत नाहीत; मात्र अवैध किंवा असंवैधानिक मार्गांनी निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळे आणले जात असतील, तर न्यायालयाचे हात बांधलेले नसतात, असंही न्यायालयाने नमूद केलं.
Supreme Court on Election Process

Supreme Court on Election Process

esakal

Updated on: 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनावरून (SIR) वाद सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेबाबत महत्त्वाची टिप्पणी केली आहे. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी आवश्यक असेल, तर न्यायालये हस्तक्षेप करू शकतात, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. निवडणूक प्रक्रियेत न्यायालये सहसा हस्तक्षेप करत नाहीत; मात्र अवैध किंवा असंवैधानिक मार्गांनी निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळे आणले जात असतील, तर न्यायालयाचे हात बांधलेले नसतात, असंही न्यायालयाने नमूद केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com