ऑल्ट न्यूजच्या झुबेर यांना दिलासा; पुढील सुनावणीपर्यंत जामीनाला मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammed Zubair Latest News

ऑल्ट न्यूजच्या झुबेर यांना दिलासा; पुढील सुनावणीपर्यंत जामीनाला मुदतवाढ

नवी दिल्ली - ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर (Mohammad Zubair) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांच्या अंतरिम जामिनाला पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ दिली आहे. झुबेर यांच्या याचिकेवर आता ७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. शिवाय झुबेर यांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला चार आठवड्यांची मुदत दिली आहे. (Mohammad Zubair News in marathi)

हेही वाचा: मगरीने 8 वर्षांच्या मुलाला अख्ख गिळलं; संतप्त गावकऱ्यांनी मगरीला ठेवलं बांधून

जुबेरने 2018 मध्ये हिंदू देवतेविरोधात केलेल्या आक्षेपार्ह ट्विटशी संबंधित प्रकरणात जामीन अर्ज दाखल केला होता. 2 जुलै रोजी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जुबेरचा जामीन अर्ज फेटाळून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायदंडाधिकारी न्यायालयाने झुबेरवरील आरोपांचे स्वरूप आणि गंभीरतेचा हवाला दिला होता. तसेच प्रकरण तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असल्याचं सांगत न्यायालयाने झुबेरला पाच दिवसांची कोठडी सुनावली होती.

दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत मोहम्मद झुबेर यांनी केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कथितपणे महंत बजरंग मुनी, नरसिंहानंद सरस्वती आणि आनंद स्वरूप यांना 'द्वेषाचे जनक' म्हणून संबोधल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. तो रद्द करण्याची मागणी अलाहबाद उच्च न्यायालयाने नकारली होती. त्याला आव्हान देणारी याचिका झुबेर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

Web Title: Supreme Court Extends Interim Bail Granted To Mohammad Zubair

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Supreme Court
go to top