Shashi Tharoor: पंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्यावरून दाखल खटल्याच्या सुनावणीला स्थगिती; न्यायालयाकडून थरूर यांना दिलासा
Supreme Court: शशी थरूर यांच्या नरेंद्र मोदींविषयी २०१८ मधील विधानावरून दाखल खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती वाढवली आहे. कोर्टाने "इतकं संवेदनशील होण्याची गरज काय?" असा प्रश्न विचारत सुनावणी १५ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्याच्या सुनावणीवरील स्थगितीचा कालावधी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी वाढविला.