आता तलाक-ए-हसन विरोधात सर्वोच्च न्यायालयीन लढाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

talaq-e-hasan
आता तलाक-ए-हसन विरोधात सर्वोच्च न्यायालयीन लढाई

आता तलाक-ए-हसन विरोधात सर्वोच्च न्यायालयीन लढाई

नवी दिल्ली - तलाक-ए-बिद्दत (Talaq-E-Biddat) म्हणजे एकाच वेळी तीनदा तलाक देण्याची मुस्लिम समाजातील (Muslim Society) अनिष्ट रूढी केंद्र सरकारने कायदा (Law) करून बंद केल्यानंतर आता तलाक-ए-हसन (Talaq-E-Hasan) व तलाक-ए-अहसन (Talaq-E-Ahsan) सारख्या घटस्फोटांच्या अनिष्ट प्रथांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) लढाई सुरू झाली आहे. दिल्लीतील पत्रकार बेनझीर हिना यांनी आज याचिका दाखल केली. दरम्यान तीन तलाक रद्द करण्याचा कायदा केला त्यानंतर मनमानी घटस्फोट देण्याची सारी प्रथाच रद्द झाल्याचा प्रचार अर्धसत्य असल्याचे यातून समोर आले आहे.

तलाक-ए-हसन व तलाक-ए-अहसन यामध्येही पुरूष एकतर्फी व मनमानी पध्दतीने वाटेल तेव्हा आपल्या पत्नीला तीनदा तलाक देऊ शकतो. या पध्दतीही बेकायदेशीर घोषित कराव्यात अशी मागणी हीना यांनी याचिकेत केली आहे. त्यांचे वकील अश्विनीकुमार दुबे यांनी सांगितले की तलाकच्या या दोन्ही पध्दती भआरतीय राज्यघटनेच्या कलम १४, १५, २१ व २५ यांच्या सरळसरळ विरोधात आहेत. देशात राज्यघटना लागूअसल्यानंतर कोणत्याही एका धर्माचा ‘पर्सनल लॉ‘ लागू करणे बेकायदेशीर आहे. तलाकच्या सर्व पध्दतीन अमानवीय असल्याने त्या रद्द केल्याचा निर्णय न्यायालयाकडून आल्यावर या अनिष्ट प्रथांना पायबंद बसेल. तलाक ए बिद्दत रद्द करण्याचा कायदा झाल्यावर अनेकांनी वरील दोन्ही पध्दतींचा आधार घेऊन तलाक देण्याची पळवाट शोधून काढल्याचे दिसून आले आहे.

मुस्लिम पर्सनल लॉ १९३९ चा आधार घेऊन तलाक-ए-हसन व तलाक-ए-अहसनद्वारे तलाक देण्याचे प्रमाण वाढले आहे. या कायद्यात तलाक देण्याचा हक्क पक्त मुसलमान पुरूषांनाच आहे व ते मनाला येईल तेव्हा पत्नीला तलाक देऊ शकतात. एक एक महिन्याच्या अंतराने तीनदा लिखीत किंवा मौखीक पध्दतीने तलाक देण्याची सोय वरील पध्दतींत आहे.

या दोन्हीही तलाक पध्दती पूर्ण बेकायदेशीर, अमानवीय व सैंगिक समानतेच्या घटनात्मक हक्काच्या सरळसरळ विरोधातील असल्याचे हिना यांनी सांगितले. त्यांच्या पतीनेही अलीकडेच तलाक ए हसनचा आधार घेऊन त्यांना घटस्फोट दिला होता. २५ डिसेंबर २०२० मध्ये पला विवाह झाला होता. हुंड्याच्या मागणीसाठी आपल्या पतीने आईवडीलांवर दबाव आणला व ती मान्य न झाल्यावर त्यांच्यासह त्यांच्या तान्ह्या मुलावरही अत्याचार करण्यात आले. अखेर त्यांना तलाक ए हसन दिल्याचे पतीने मोबाईलवरून कळविले. अशा एकतर्फी घटस्फोटांना अनेक इस्लामी देशांनीही बंदी घातल्याचे हीना यानी सांगितले.

Web Title: Supreme Court Fights Against Talaq E Hasan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top