

Supreme Court
esakal
नवी दिल्ली: ‘इंडियाज गॉट लॅटंट’ कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींविषयी केलेल्या असंवेदनशील विनोदांमुळे निर्माण झालेल्या कायदेशीर प्रक्रियेत दिलेल्या हमीपत्रांचे पालन न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने स्टँडअप कॉमेडियन समय रैना आणि त्याच्या चार सहकाऱ्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला. समय रैनाने न्यायालयाला गृहित धरून आदेशांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र रोष व्यक्त केला.