
सुप्रीम कोर्टाने नवीन वक्फ कायद्यातील दोन तरतुदींच्या अंमलबजावणीस अंतरिम स्थगिती दिली असून केंद्र सरकराने सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहे. सरकारने जैसे थे परिस्थिती ठेवावी असे कोर्टाने सांगितले आहे. सुनावणीचा आजचा दुसरा दिवस होता. या प्रकरणी पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार आहे. वक्फ बोर्ड आणि परिषदांवर नियुक्त्या करु नयेत. वक्फ वापरत असलेल्या मालमत्ता डी-नोटिफाय करुन नयेत असे निर्दश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.