

Green firecrackers Diwali permission: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात नागरिकांना काही अटी आणि शर्थींसह पर्यावरणपूरक ग्रीन फटाके फोडण्यास तात्पुरती मुभा दिली आहे. फटाक्यांमुळे प्रदूषण होते हे मान्य असले, तरी सरसकट बंदी घालूनही पारंपरिक फटाक्यांची बेकायदा विक्री सुरूच राहते; त्यामुळे संपूर्ण बंदी घालण्याऐवजी केवळ ग्रीन फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर नियंत्रित करणे अधिक व्यवहार्य ठरेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.