Supreme Court : धार्मिकस्थळांबाबतच्या नव्या खटल्यांना ब्रेक......सर्वोच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयांना निर्देश
Supreme Court Halts New Lawsuits : सर्वोच्च न्यायालयाने प्रार्थनास्थळांवरील वादांवर स्थगिती घालण्याचे निर्देश दिले आहेत. १९९१ च्या धार्मिक स्थळे कायद्याच्या वैधतेवर पुढील सुनावणी होईपर्यंत कोणताही नवा खटला दाखल होणार नाही.
नवी दिल्ली : सध्या देशभरात ज्या प्रार्थनास्थळांवरून वाद सुरू आहेत त्याबाबत सर्वेक्षण अथवा अन्य कायदेशीर बाबींबाबत कोणतेही आदेश देण्यात येऊ नयेत असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज देशभरातील सत्र न्यायालयांना दिले आहेत.