

सर्वोच्च न्यायालयाने एकाच सुनावणीत ६१ प्रकरणांचा निपटारा करताना, ३२ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका घटस्फोटाच्या याचिकेवर अंतिम निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने संविधानाच्या कलम १४२ अंतर्गत विशेषाधिकाराचा वापर करून पती-पत्नीला घटस्फोट मंजूर केला. १९९४ पासून चालू असलेल्या या प्रकरणात दोन्ही पक्ष दीर्घकाळ विभक्त राहिले होते.