

Supreme Court of India
esakal
Supreme Court Verdict on Interim Maintenance Explained : सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी एका महत्त्वपूर्ण निकालात असे स्पष्ट केले की, जर पत्नीवर दुसऱ्या पुरुषाशी शारीरिक संबंध असल्याचा आरोप असेल आणि तो आरोप प्रथमदर्शनी खरा वाटत असेल, तर तिला अंतरिम पोटगी दिली जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचोली यांच्या खंडपीठाने राजस्थान उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. उच्च न्यायालयाने म्हटले होते की, पतीचा सीआरपीसी च्या कलम १२५(४) अन्वये दाखल केलेला अर्ज प्रलंबित असताना पत्नीला अंतरिम पोटगी नाकारता येणार नाही.