Supreme Court: विरोधाच्या नावाखाली आंदोलनस्थळाचा ताबा नको ;‘जंतरमंतर’संबंधी याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

Supreme Court on Jantar Mantar Protest : आंदोलनाच्या नावाखाली जंतरमंतरवरील जागेवर कायमस्वरूपी ताबा मिळवता येणार नाही, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. आंदोलनाचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
The Supreme Court commented on protest rights and the use of designated protest sites at Jantar Mantar.

The Supreme Court commented on protest rights and the use of designated protest sites at Jantar Mantar.

Esakal
Updated on: 

नवी दिल्ली, : ‘विरोध करण्याच्या नावाखाली आंदोलनस्थळावर कोणीही कायमचा ताबा मिळवू शकत नाही,’ अशी टिपणी ‘जंतरमंतर’वरील आंदोलनाच्या अनुषंगाने दाखल असलेल्या विविध याचिकांच्या एकत्रित सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आज केली. एकाच पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार नाहीत. तुम्ही ताबा घेतला तर शेतकरी, पत्रकार, वकील आदी आंदोलनकर्त्यांनी कुठे जायचे, प्रत्येकाला विरोध करण्याचा अधिकार असल्याचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले.

Loading content, please wait...