
Pankaj Mithal Statement : विधी महाविद्यालये आणि विद्यापीठांनी वेद, रामायण आणि महाभारत यांसारख्या महाकाव्यांमध्ये समाविष्ट असलेल्या प्राचीन कायदेशीर तत्त्वज्ञानाचा औपचारिकपणे अभ्यासक्रमात समावेश करण्याची वेळ आली आहे, असं मत सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पंकज मित्तल यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाची 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भोपाळच्या नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटीनं (NLIU) 12 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या कायदेविषयक परिषदेत ते बोलत होते.