CJI Surya Kant: सुप्रीम कोर्टात अचानक तणाव; सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले... तरुण वकिलाने नेमकं काय केलं?

PIL dismissed Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने एका तरुण वकिलाने दाखल केलेल्या पाच जनहित याचिका फेटाळताना तीव्र नाराजी व्यक्त केली. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी अशा याचिका प्रसिद्धीसाठी दाखल करू नयेत, असा इशाराही दिला.
CJI Surya Kant

CJI Surya Kant

esakal

Updated on

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एका तरुण वकिलाने दाखल केलेल्या पाच जनहित याचिका फेटाळून लावल्या. या याचिका निरर्थक आणि प्रसिद्धीमागे धावणाऱ्या असल्याचे मत व्यक्त करत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तीव्र नाराजी दर्शवली. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर आलेल्या प्रकरणात सरन्यायाधीशांनी वकिलाला थेट सल्ला देताना म्हटले की, “मी या बाबतीत अतिशय रूढीवादी आणि ठाम आहे. कायद्याच्या अभ्यासाऐवजी सोशल मीडियावर लक्ष वेधण्यासाठी अशा याचिका दाखल करणे बंद व्हायला हवे.”

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com