

Supreme Court grants live-in partners equal rights under IPC 498A
esakal
सुप्रीम कोर्टाने 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. जोडीदार किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून होणारा छळ किंवा अत्याचार यांसारख्या प्रकरणांमध्ये, लिव्ह-इन जोडीदाराला पत्नीप्रमाणेच अधिकार असतील, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. कोर्टाने म्हटले आहे की, भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ४९८-अ जे पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून केल्या जाणाऱ्या क्रूरतेशी संबंधित आहे ते आता लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडीदारांनाही लागू होईल.