

Supreme Court Issues Notice to Election Commission Officials
esakal
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणात न्यायालयाने भारत सरकारसह तिन्ही निवडणूक आयुक्त, कॅबिनेट सचिव, वरिष्ठ उप-निवडणूक आयुक्त (DEC) मनीष गर्ग आणि आयटी प्रमुख सीमा खन्ना यांना नोटीस बजावली आहे. याचिकेत विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी करण्याची तसेच निवडणूक आयोगाच्या 'मानक कार्यपद्धती'ला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे.