

sakal
नवी दिल्ली: कोणती प्रथा धार्मिक आणि कोणती धर्मनिरपेक्ष हे न्यायालय कसे काय ठरवणार? असे सांगतानाच लाखो लोकांच्या आस्थेला चुकीचे ठरविणे कठीण असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने बुधवारी शबरीमला प्रकरणाच्या सुनावणीवेळी केली. ‘‘समाजसुधारणेच्या नावाखाली धर्माला खिळखिळे केले जाऊ शकत नाही,’’ असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले.