

Supreme Court Chief Justice Surya Kant directs the Central and Delhi governments to submit detailed responses within 10 days over allegations of detention during protests against Chief Election Commissioner Gyanesh Kumar
esakal
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान अनेक माजी मुख्यमंत्री, राजकीय नेते आणि सामान्य नागरिकांना ताब्यात घेतल्याच्या आरोपांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला सविस्तर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही सरकारांना आपली भूमिका मांडण्यासाठी न्यायालयाने 10 दिवसांची मुदत दिली आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान हे आदेश देण्यात आले.