Noida Supertech Twin Towers demolition : ‘ट्विन टॉवर’ पाडण्याची तयारी पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

supreme court order sector 93 a Noida Supertech Twin Towers demolition

Noida Supertech Twin Towers demolition : ‘ट्विन टॉवर’ पाडण्याची तयारी पूर्ण

नोएडा : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येथील सेक्टर ९३ ए मधील ‘सुपरटेक ट्विन टॉवर’ ही १०० मीटर उंचीची अवैध इमारत रविवारी (ता.२८) रोजी पाडण्यात येणार आहे. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी स्फोटकांच्या साह्याने टॉवर उद्धवस्त केला जाईल. यासाठी नोएडात त्यादिवशी दुपारी अडीच ते तीनपर्यंत हवाई उड्डाणे बंद राहणार आहेत.

सुपरटेक लिमिटेड या नोएडातील रियल इस्टेट कंपनीने सेक्टर ९३ ए मध्ये अपेक्‍स आणि केयान हे ४० मजली टॉवर २००९ मध्ये उभारले. पण बांधकाम व्यावसायिकाने यात नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा करीत प्लॅटधारकांनी त्याविरोधात कायदेशीर लढाई लढली होती. नोएडा प्राधिकरणापासून याला सुरुवात झाली. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात व शेवटी सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. पण रहिवासी कल्याण संघटनेने (आरडब्लूए) हार मानली नाही.

अखेर सर्वोच्च न्यायायलयाने ट्विट टॉवर बांधता अनियमितता झाली असून नोएडा प्राधिकरणाने यात भ्रष्टाचार केला असल्याचा निर्णय दिला. सुपरटेक टॉवर पाडण्याचा आदेश एक वर्षापूर्वी दिला त्यासाठी नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदत दिली होती. पण त्यानंतर कारवाईसाठी मुदतवाढ देण्यात आली. आता २८ ऑगस्ट २०२२ रोजी ट्विन टॉवर उद्‍ध्वस्त करण्यात येणार आहे. सध्या या टॉवरमध्ये कोणीही राहत नाही.

अशी केली तयारी

 • अडिफिस इंजिनिअरिंग आणि नोएडाच्या पाडकाम विभागातर्फे कारवाई होणार

 • नोएडा द्रुतगती मार्ग अर्धा तास बंद ठेवणार

 • अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलिस तैनात

 • तीन हजार ७०० किलो स्फोटकांचा वापर

 • स्फोटाच्या हादऱ्याने अन्य इमारतींचे नुकसान होऊ याची खबरदारी

 • परिसरातील सात हजार लोकांना सकाळी सात वाजताच घराबाहेर पडण्याची व सायंकाळी परतण्याच्या सूचना

 • ट्विन टॉवरपासून नऊ मीटर अंतरावरील ‘सुपरटेक इमराल्ड कोर्ट’ आणि ‘एटीएस व्हिलेज’मधील घरात बांधाबांध सुरू

 • स्फोटानंतर केवळ १२ सेकंदात इमारत कोसळणार

 • परिसरातील इमारतींवर धूळ प्रतिबंध कापडाचे आवरण

 • इमारत पडल्यानंतर ३५ हजार घनमीटर मलबा साठणार

 • धूळ व मलबा उचलण्याचे काम तातडीने हाती घेणार.

 • ४० मजली इमारतीचे वरील मजले आधीच कामगारांच्या मदतीने पाडण्यात आले आहे.

 • अपेक्‍स (सध्या ३२ मजले) आणि केयान (२९ मजले) या इमारतींचे उर्वरित बांधकाम पाडण्यासाठी ‘वॉटरफॉल’ स्फोट तंत्रज्ञान वापरणार

 • ‘वॉटरफॉल’ तंत्रज्ञानानुसार प्रथम तळमजला पडणार.

Web Title: Supreme Court Order Sector 93 A Noida Supertech Twin Towers Demolition

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..